भौगोलिक मानांकन नोंदणी कक्ष
एखाद्या भौगोलिक प्रदेशातील वैशिष्ठ्यांमुळे, हवामान, संस्कृतीमुळे, एखाद्या उत्पादनात, त्याच्या उत्पादन प्रक्रियेत अनेक वर्ष दर्जा, चव, रंग, वास उतरत असतील, ते गुणधर्म वर्षानुवर्ष कायम राहत असतील, तर अशा उत्पादनांची नोंदणी रजिस्ट्रार, ऑफ जिओग्राफिकल इंडिकेशन, कार्यालय, चेन्नई येथे करून भौगोलिक चिन्हांकन/मानांकन प्राप्त करता येते.
भौगोलिक चिन्हांकन/ मानांकन प्राप्त कृषी उत्पादनांना इतर प्रदेशातल्या अनधिकृत उत्पादनांपासुन, भेसळ होणे, रास्त किंमतीपेक्षा कमी किंमत मिळणे यासारख्या गोष्टींपासुन दहा वर्षे संरक्षण प्राप्त होते. तसेच संरक्षण कालावधी वाढविणे शक्य होते. यामुळे राज्यातील स्थानिक कृषि उत्पादकांना बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होते.
सद्यस्थितीत राज्यामध्ये एकूण 28 प्रकारच्या कृषि उत्पादनांना भौगोलिक चिन्हांकन/ मानांकन प्राप्त झाले आहे. राज्यातील कृषि हवामान, विभागांमुळे प्रत्येक भागातील विविध वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने आहेत. अशा उत्पादनांची नोंदणीकरीता नोंदणीकृत शेतकरी समूह, शेतकरी गट, उत्पादक संघ इत्यादींना सल्ला सेवा देण्याकरीता महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामध्ये भौगोलिक मानांकन नोंदणी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
कक्षामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा -
- भौगोलिक मानांकनासाठी संभाव्य उत्पादनाची मालकी मिळवण्यासाठी उत्पादनाच्या तपशिलवार अर्जदार संस्थेच्या माहितीनुसार अहवाल तयार करणे (उत्पादनांची वैशिष्ट्ये,भौगोलिक मानांकनासाठी नाव आणि लोगो, मालाचे वर्णन, उत्पादनाचे भौगोलिक क्षेत्र आणि नकाशा इ.)
- अर्जदार संस्थेच्या वतीने रजिस्ट्रार ऑफ जिओग्राफिकल इंडिकेशन्स, चेन्नई. प्राधिकरणाकडे अर्ज सादर करणे.
- नोंदणीच्या प्रत्येक टप्प्यावर संबंधित प्राधिकरणाकडे पाठपुरावा करून त्रुटी पूर्तता करणे.
- प्राधिकरणाकडे हरकतीच्या प्रत्येक सुनावणीस उपस्थीत राहणे, भौगोलिक मानांकनाची प्रक्रिया पुर्ण करणे.
- भौगोलिक मानांकन प्राप्त झालेनंतर अधिकृत वापरकर्ते वाढवण्यासाठी मार्गदर्शन,तसेच त्यांच्या उत्पादनाच्या विपणनासाठी मार्गदर्शन,भौगोलिक मानांकन उत्पादनांच्या विकासाकरिता विविध योजनांची अंमलबजावणी.
भौगोलिक चिन्हांकन/मानांकन अंतर्गत नोंदणीचे फायदे-
- भौगोलिक चिन्हांकन मानांकीत नोंदणीकृत उत्पादनाचे अधिकृत वापरकर्ता म्हणून ओळख निर्माण होते.
- अधिकृत वापरकर्ता म्हणून नोंदणी केल्यामुळे भौगोलिक चिन्हांकनाचा लोगो लावून विक्री करता येते. पिकाची वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्माची ओळख निर्माण करून त्याची ग्राहकाला विक्री करण्यास मदत होते.
- भौगोलिक चिन्हांकनाचा अधिकृत लोगो वापरून विक्री केल्यामुळे अधिक (प्रिमियम) किंमत मिळण्यास मदत होते.
- भौगोलिक चिन्हांकन प्राप्त पिकाची निर्यातदारामार्फत निर्यात करता येते किंवा स्वत: निर्यात करता येते. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रँड विकसित होण्यास मदत होते.
भौगोलिक चिन्हांकन/मानांकन नोंदणी करण्याकरिता कोण अर्ज करू शकतो:
नोंदणीकृत व्यक्ती समूह/शेतकरी गट/ शेतकरी उत्पादक कंपन्या, संघ किंवा उत्पादक संघटना इ. जे त्या उत्पादनाच्या हिताशी संबंधित असतील तेच या मानांकन नोंदणीसाठी अर्ज करू शकतात.
नविन भौगोलिक मानांकन प्राप्त करणे करीता अधिक माहितीसाठी संपर्क -
मानांकन नोंदणी कक्ष (मुख्य कार्यालय) पुणे : 020-24528100/200
श्री.मंगेश कदम (सहाय्यक सरव्यवस्थापक) मो.क्र.7588022201
श्री.आनंद शुक्ल (सहाय्यक) मो.क्र.8788597834