शासनाच्या, आयातदाराच्या व आयातदार देशांच्या बदलत्या निकषांनुसार सदर कागदपत्राची यादी बदलु शकते.
कृषी पणन मंडळाच्या योजना -
कृषीमाल निर्यातीच्या केंद्र शासनाच्या इतर प्रमुख योजना -
कृषि पणन मंडळाच्या सुविधा केंद्रांची माहिती महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या https://www.msamb.com/Export/Facilities# या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत प्रतिमहिना हॅार्टीकल्चर एक्सपोर्ट ट्रेनिंग कोर्सचे आयोजन केले जाते. , (कालावधी - 5 दिवस, प्रत्येक महिन्यातील शेवटचा आठवडा)
सदर प्रशिक्षणाची अधिक माहिती https://www.msamb.com/Documents/43b14155-f944-4123-95ff-516bae0996ee.pdf या लिंकवर उपलब्ध आहे.
(प्रत्यक्ष निर्यात करणेपुर्वी आयातदाराबाबतीत सर्वकष माहिती घेऊनच व्यवहार करावा. व्यवहारामधे काही अडचणी निर्माण झाल्यास त्यास महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ जबाबदार राहणार नाही.)
आयात/निर्यात परवाना काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता संस्थेने करुन द्यावयाची आहे.यामध्ये संस्था अथवा व्यक्तीलाही आयात/निर्यात परवाना प्राप्त करता येता व त्यासाठी प्राप्तीकर विभागाकडून प्राप्त होणारा पॅन क्रमांक असणे आवश्यक आहे. खालीलप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.
सर्व कागदपत्रे 2 प्रतीत व स्वत: प्रमाणीत (self attested) केलेली असावीत. सहसंचालक, विदेश व्यापार यांचेकडून काही वेळा मूळ कागदपत्रे तपासणीसाठी मागवितात.
सेवा शुल्क :- आयात निर्यात परवाना काढून देण्यासाठी कृषि पणन मंडळाकडून प्रति परवाना रु. 500/- याप्रमाणे सेवाशुल्क आकारण्यात येईल.
हापूस आंब्याच्या निर्यातीसाठी प्रामुख्याने फळाचे वजन, पॅकींग, फळाचा आकार इ. गोष्टी महत्त्वाच्या आहेत. विविध देशांच्या मागणीप्रमाणे निर्यातदारास सर्व गोष्टींची पूर्तता करावी लागते.त्यात प्रामुख्याने खालीलप्रमाणे निकष आहेत.
भारतात प्रामुख्याने निर्यातीसाठी भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या अखत्यारित काम करणारी सर्वोच्च संस्था म्हणून अपेडा, (ॲग्रीकल्चरल ॲन्ड प्रोसेस्ड फूड्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ॲथोरिटी) नवी दिल्ली, नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड, (ई.सी.जी.सी.), आयात निर्यात बॅंक व महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ इ. संस्थाकडून मदत करण्यात येते.
पॉलिहाऊसमध्ये उत्पादित करण्यात येणा-या कार्नेशन, जरबेरा,गुलाब,ऑर्किड, ॲन्थुरियम यांसारख्या फुलांना हॉलंड, सिंगापूर, जर्मनी व अमेरीका या देशांतून प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. कार्नेशन व जरबेरा फुलांसाठी गुणवत्ता पुढीलप्रमाणे असावी -
नाही, सहकारी संस्थांचे तसेच वैयक्तिक, कृषि उत्पन्न बाजार समिती व इतर संस्थांचे प्रकल्प अहवालही तयार केले जातात.
नाही, सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यापुरते मर्यादित नाही. सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याबरोबर कर्ज मंजूर असलेल्या प्रकल्पांना उभारणीस मार्गदर्शन करणे, वित्तीय सहाय्य प्रस्ताव तयार करणे तसेच इतर शेतीविषयक व तांत्रिक मार्गदर्शन मिळते.
प्रकल्प अहवाल तयार करण्याचे शुल्क प्रकल्पाच्या एकूण खर्चावर पुढीलप्रमाणे आकारण्यात येते.
सध्या अस्तित्वात असलेल्या केंद्र व राज्य शासन अनुदान योजनांची माहिती प्रकल्पानुरुप मिळते.
प्रकल्पांना वित्तीय संस्थांकडून अर्थसहाय्य प्राप्त करण्याकरिता वित्तीयसहाय्य प्रस्ताव तयार करण्यात येतो.
नाही, सदर योजना केवळ महाराष्ट्रातून रस्ते वाहतूकीद्वारे परराज्यात शेतमाल वाहतूक करून प्रत्यक्ष विक्री करण्यात येणा-या व्यवहारासाठी लागू आहे.
राज्यातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्या व शेतमाल उत्पादकांच्या सहकारी संस्था योजनेअंतर्गत अनुदान मिळणेस्तव पात्र आहेत.
नाही, राज्यातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतमाल उत्पादकांच्या सहकारी संस्थांच्या सभासदांनी स्वत: उत्पादित केलेला शेतमालच संबधीत राज्यामध्ये पाठविणे आवश्यक आहे.
होय, योजनेंतर्गत कामकाज सुरू करणेपुर्वी अर्जदार संस्थेने पणन मंडळाची प्रत्येक कन्साईनमेन्ट करीता पुर्वमान्यता घेणे आवश्यक आहे.
सदर योजना आंबा, केळी, डाळींब, द्राक्षे, संत्रा, मोसंबी, कांदा, टोमॅटो, आले व भाजीपाला या नाशवंत पिकांसाठी लागू आहे.
होय, योजनेमध्ये नमूद नसलेला नाशवंत शेतमाल परराज्यात पाठवायचा झाल्यास लाभार्थी संस्था/ कंपनीने तसा स्पष्ट उल्लेख करून पणन मंडळाची पुर्वमान्यता घेणेआवश्यक आहे.
.किमान 350 कि.मी अंतर असणे आवश्यक आहे.
.या योजनेअंतर्गत एका लाभार्थी शेतमाल उत्पादक सहकारी संस्था/उत्पादक कंपनीस एका आर्थिक वर्षात कमाल रू.3.00 लाख एवढे वाहतूक अनुदान देय आहे. सदर अनुदान केवळ महाराष्ट्रातून इतर राज्यात केलेल्या एकेरी वाहतूकीस लागू आहे.
.नाही, शेतकरी उत्पादक कंपनी / सहकारी संस्थेने वाहतूकदारास देय असलेली वाहतूक भाड्याची रक्कम धनादेश/आरटीजीएस/ऑनलाईन बँकींगद्वारे अदा करणे बंधनकारक आहे.
संबंधीत शेतकरी उत्पादक कंपनी/सहकारी संस्था यांनी या योजनेअंतर्गत परराज्यात पाठविण्यात आलेल्या वाहतूक खर्चाचे अनुदान मागणी प्रस्ताव शेतमाल विक्रीनंतर 30 दिवसांत आवश्यक त्या कागदपत्रांसह विभागीय कार्यालयाकडे सादर करणे आवश्यक आहे.
.परराज्यात शेतमाल पाठवित असताना 1 कन्साईनमेंट मध्ये शेतकरी उत्पादक कंपनी / संस्थेच्या किमान 3 उत्पादक शेतकरी सभासदांचा शेतमाल एकत्रितपणे पाठविणे आवश्यक आहे.
सदर योजनेच्या पूर्वमान्येतकरीता महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या संबंधित विभागीय कार्यालयाकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
नाही, सदर योजनेमध्ये प्रक्रिया केलेला शेतमाल पाठविता येणार नाही. तसेच डाळी व धान्य या योजनेअंतर्गत पाठविता येणार नाही.
योजनेविषयी सविस्तर माहिती महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या www.msamb.com या संकेतस्थळावर उपलब्धआहे.
या योजनेअंतर्गत प्रति स्टॉल रू.2000 एवढे अनुदान देण्यात येते. यानुसार एका आर्थिक वर्षात किमान 10 व कमाल 50 स्टॉलकरीता रू.1.00 लाख एवढे अनुदान देण्यात येते. राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्या, कृषि व पणनाशी संबधित सहकारी संस्था, शासनाचे विभाग,शेतकरी उत्पादक कंपन्या व पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आणि संस्था नोंदणी अधिनियम, 1860 खाली नोंदणी झालेल्या संस्था महोत्सवांचे आयोजन करू शकतात. तथापी, आयोजनापुर्वी कृषि पणन मंडळाची मंजूरी घेणे आवश्यक असते.
देशांतर्गत व्यापारास अलिकडे फार महत्व प्राप्त झालेले आहे. दिवसे-दिवस वाढणारी मागणी व मागणीमधील विविधता , दर्जा व प्रकृतीबाबत ग्राहकांमध्ये झालेली जागृती, यामुळे चीन नंतर जगातील भारत हे सर्वात मोठे मार्केट आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत.
गाव पातळीपासुन ते राज्या-राज्यामधून जो व्यापार चालतो त्यास आपण देशांतर्गत व्यापार म्हणतो. तर निर्यात व्यापार हा आपल्या देशामधून इतर देशांमध्ये शेतमाल पाठवितो त्यास निर्यात व्यापार म्हणतो. परंतु परदेशात निर्यात करताना IEC (Import-Export Code) काढणे, शेतमाल पाठविण्यासाठी CHA(Custom House Clearing Agent) नेमणे, APEDA कडे रजिस्टे्रशन करणे, याबरोबरच देशनिहाय वेगवेगळ्या नियमावलींचे पालन करावे लागते. जसे, अमेरिकेस आंबा पाठवायचा झाल्यास इरॅडिएशन ट्रिटमेंट देणे, युरोपियन देशात पाठवण्यासाठी HWT (Hot water Treatment) देणे, Phytosanitary Certificate प्राप्त करणे इत्यादी बाबी अत्यावश्यक असतात.तर देशांतर्गत व्यापारास या बाबींची आवश्यकता नाही.त्यामुळे सुलभरित्या व्यापार करता येतो.
राज्यातील शेतमाल उत्पादक सहकारी संस्था व शेतकरी उत्पादक कंपन्यां या योजनेचा लाभ घेऊ शकतात. सभासदांचा नाशवंत शेतमाल परराज्यात पाठविण्यासाठी वाहतूक खर्चाच्या 50 % टक्के व अंतरानुसार रू.20,000 ते रू.75,000 पर्यंत अनुदानाचा लाभ घेऊ शकतात.
नाही, सदर योजनेमध्ये प्रक्रिया केलेला शेतमाल तसेच डाळी व धान्य या योजनेअंतर्गत पाठविता येणार नाही. तथापी, नाशवंत शेतमालाकरिता वाहतूक अनुदान देण्यात येते.
फळ व धान्य उत्पादकांना महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी स्वत: उत्पादक असणे गरजेचे आहे. महोत्सवामध्ये शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था सहभागी होऊ शकतात.
शेतमालासाठी महाराष्ट्रातील जशी वाशी (नवी मुंबई), पुणे, नागपूर ह्या मोठ्या बाजारपेठा आहेत. तसेच दिल्ली येथील आझादपूर मंडी, चेन्नई येथील कोयमबेडु, कोयब्मतूर, बंगलोर येथील यशवंतपूर, कोलकाता येथील मोस्ता व मेचुआ मार्केट, आसाममधील फॅन्सी बाजार, राजस्थानमधील जयपूर, अजमेर, बिकानेर, जोधपूर, अलवर, कोटा, उदयपूर ह्या देशामधील काही महत्वाच्या बाजारपेठां आहेत. यातील काही महत्वाच्या बाजारपेठामधील खरेदीदार-व्यापारी यांची माहिती पणन मंडळाच्या www.msamb.com या संकेस्थळावर उपलब्ध आहे.